Vakprachar in Marathi with meaning नमस्कार !! विविध स्पर्धा परीक्षा,नोकर भरती परीक्षांमध्ये हमखास वाक्प्रचार वर आधारित प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न अचूक सोडवण्यासाठी खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
सर्वप्रथम आपण ..
Table of Contents
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

वाक्यप्रचार म्हणजे काय ?
मराठी भाषेत विविध वाक्प्रचार चा वापर केला जातो. वाक्प्रचाराचा वापर संभाषण व लेखनात केल्याने भाषिक सौंदर्य खुलून दिसते. भाषा प्रभावी होते .
शब्दसमुहाचा शब्दशः अर्थ लक्षात न घेता वेगळ्या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या शब्द समुहास वाक्प्रचार म्हणतात.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (Vakprachar In Marathi)
अभिनंदन करणे – कौतुक करणे.
वाक्य – दहावीच्या परीक्षेत विद्यालयात पहिल्या आलेल्या केशवचे गुरुजींनी अभिनंदन केले.
अवाक होणे – आश्चर्यचकित होणे.
वाक्य – अचानक आकाशात उमटलेले इंद्रधनुष्य पाहून हर्षा अवाक झाली.
अमलात आणणे – कारवाई करणे.
वाक्य – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बरेच नियम अमलात आणले.
अन्नान दशा होणे – उपासमारीची पाळी येणे.
वाक्य – महापुरामुळे उत्तराखंडातील शेकडो खेडेगावांतील लोकांची अन्नान दशा झाली आहे.
अबाधित ठेवणे – बंधन न घालणे.
वाक्य – वडिलांच्या निधनानंतर राजाने शेतावरच हक्क अबाधित ठेवला.
अमर होणे – चिरकाल नाव राहणे.
वाक्य – जे सैनिक देशासाठी लढून मृत्यू पावले, ते वीर अमर झाले.
अवगत होणे – माहित होणे, कळणे, आकलन होणे.
वाक्य – चार दिवसांच्या अभ्यासाने रोनित ला कॉम्पुटर चालवण्याची कला अवगत झाली.
अप्रूप वाटणे – आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.
वाक्य – लहानगी नेहा चे मधुर गीत ऐकून श्रोत्यांना तिचे अप्रूप वाटते.
अभिलाषा धरणे – एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.
वाक्य – आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची कधीच अभिलाषा धरू नये.
अवगत करणे – माहित करून घेणे.
वाक्य – कल्याणीने इंग्रजी भाषा चांगलीच अवगत केली आहे.
अर्धचंद्र मिळणे – हकालपट्टी होणे.
वाक्य – भ्रष्टाचार करणाऱ्यांना शासकीय सेवेतून ताबडतोब अर्धचंद्र मिळाला पाहिजे.
अवसान गोळा करणे – धीर गोळा करणे.
वाक्य – शेवटी अवसान गोळा करून प्रणीतने सरांसमोर आपला गुन्हा कबूल केला.
अचंबा वाटणे – नवल वाटणे, आश्चर्य वाटणे.
वाक्य – चार वर्षाच्या संगीताला सहजपणे संगणक चालवताना पाहून सर्वांनाच अचंबा वाटला.
अद्दल घडणे – शिक्षा करणे.
वाक्य – गजांआड टाकून पोलिसांनी चोरांना चांगलीच अद्दल घडवली.
अभंग असणे – एकसंध, अखंड असणे.
वाक्य – कितीही संकटे आली तरी भारतीयांची एकात्मता अभंग राहील.
अर्ध्या वचनात राहणे – आज्ञेत राहणे.
वाक्य – आजच्या आधुनिक काळात, स्त्रीने पुरुषाच्या अर्ध्या वचनात राहावे, ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.
अटक करणे – कैद करणे.
वाक्य – खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी अखेर अट्टल चोरांना अटक केली.
अवलंब करणे – अंगीकारणे, स्वीकारणे.
वाक्य – गुरुजींनी दिलेल्या ज्ञानाचा सईने वेळेत अवलंब केला.
अजरामर होणे – कायम स्मरणात राहणे.
वाक्य – ज्या वीर सैनिकांनी देशासाठी आपले प्राणार्पण केले, ते अजरामर झाले.
अभिप्राय देणे – मत देणे, प्रतिक्रिया करणे.
वाक्य – राजूने लिहिलेले पत्रलेखन चांगले आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.
अपशकुन मानणे – प्रतिकूल घडण्याचा संकेत मिळणे, वाईट शंका येणे.
वाक्य – आताच्या विज्ञाननिष्ठ जगात ‘ अपशकुन मानणे ‘ ह्या सारखी अंधश्रद्धा जोपासणे चुकीचे आहे.
अलगद उचलणे – सावकाश उचलणे.
वाक्य – समीरने आपले पुस्तक अलगद उचलले.
अशुभाची सावली पडणे – अमंगल घडणे, विपरीत घडणे.
वाक्य – लग्नानंतर लगेच चार महिन्यात विधवा झालेल्या राजश्रीवर जणू अशुभाची सावली पडली.
अढी नसणे – मनात डंख न ठेवणे, मनात किल्मिष न ठेवणे.
वाक्य – स्पष्ट बोलणे झाल्यामुळे मनीषच्या मनात मनोहरबद्दल कोणतीही अढी नव्हती.
अचूक वेध घेणे – न चुकता नेम साधणे.
वाक्य – नेमबाज अभिनव बिंद्रा ने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
असंतोष निर्माण होणे – चीड येणे, एखाद्या गोष्टीबद्दल खूप नाराजी निर्माण होणे.
वाक्य – इंग्रजी राजवटीविरोधी भारतीय लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
अपूर्व योग येणे – दुर्मीळ योग येणे.
वाक्य – परवा सूर्यग्रहण व चंद्रगहण एकाच दिवशी होण्याचा अपूर्व योग येणे आहे.
हे पण वाचा: मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग
अवगत असणे – माहित असणे.
वाक्य – आदिवासी स्त्रियांना टोपली विकण्याची कला अवगत असते.
अधीर होणे – उत्सुक होणे.
वाक्य – आजोबांनी नवीन आणलेल्या खेळणीशी खेळण्यासाठी पूर्वाचे मन अधीर झाले होते.
मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग (Marathi Vakprachar Vakyat Upyog)
उरी फुटून मरणे – अतिश्रमाने मरण येणे.
वाक्य – पावसाअभावी अन्न पिकवण्यासाठी शेतकरी उरी फुटून मरत आहेत.
उपकार फेडणे – उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.
वाक्य – ज्यांनी आपणांस मदत केली, आपण त्यांचे उपकार फेडावेत.
उजळ माथ्याने फिरणे – उघडपणे वावरणे.
वाक्य – अनेक गुंड जामिनावर सुटून येऊन उजळ माथ्याने फिरतात.
उघड्यावर टाकणे – निराधार करणे, जबाबदारी झटकणे.
वाक्य – कर्मचाऱ्यांनी संप करून, शासकीय काम उघड्यावर टाकले.
उदरनिर्वाह करणे – पोट भरणे, उपजीविका करणे.
वाक्य – दिवसभर शेतावर काम करून शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात.
उंडारने – बागडणे, हुंदडणे.
वाक्य – अभ्यास सोडून गावभर उंडारने बरोबर नाही, हे आई रमेशला समजावून सांगत होती.
उगम होणे – सुरुवात होणे.
वाक्य – त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो.
उंबरठा ओलांडणे – मर्यादा सोडणे.
वाक्य – आईला वाटेल तसे बोलून कौशलने उंबरठा ओलांडला.
उधळून टाकणे – विखरून टाकणे.
वाक्य – खोडकर वासराने धान्याची रास उधळून लावली.
उत्कट प्रेम असणे – खूप गाढ प्रेम असणे.
वाक्य – माझे माझ्या भारत देशावर उत्कट प्रेम आहे.
उन्माद होणे – गुर्मी चढणे.
वाक्य – लॉटरीत 50 लाखांचे बक्षीस मिळताच पंकजच्या वागण्यात उन्माद आला.
उत्तेजन देणे – प्रोत्साहन देणे.
वाक्य – अभिजीतला मन लावून अभ्यास करण्यासाठी गुरुजींनी भरपूर प्रोत्साहन दिले.
उड्डाण करणे – झेप घेणे.
वाक्य – परदेशी उच्चशिक्षणानिमित्त जाण्याऱ्या विपूलच्या विमानाने अखेर उड्डाण घेतले.
खडे फोडणे – दोष देणे.
वाक्य – सचिनकडून अंगठी हरवल्यामुळे सर्वजण त्याच्यावर खडी फोडत आहेत.
खोडा घालणे – संकट निर्माण करणे, विघ्न आणणे.
वाक्य – गावात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पाला काही माणसांनी खोडा घातला.
खोडी उलटणे – आपण केलेली खोडी अंगाशी येणे.
वाक्य – ऋषी धीरजची मस्करी करायला गेला, पण त्याची त्याच्यावरच खोडी उलटली.
खंत करणे – काळजी करणे, चिंता करणे.
वाक्य – बाहेरगावी शिकायला गेलेल्या चिन्मयची आई खंत करते.
खंत न करणे – काळजी न करणे.
वाक्य – खूप संकटे वाटयाला आली, तरी अमितरावांनी कधी खंत बाळगली नाही.
खडानखडा माहिती असणे – बारीकसारीक माहिती असणे.
वाक्य – आमच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या कामाची खडानखडा माहिती आहे.
खांदे पडणे – निराश होणे, दीनवाणे होणे.
वाक्य – अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे दिव्याचे खांदे पडले.
खुशामत करणे – स्तुती करणे.
वाक्य – मित्रांसोबत सहलीस जाण्याची परवानगी मिळावी, म्हणून सचिनने वडिलांची खुशामत करत होता.
खूणगाठ बांधणे – निश्चय करणे.
वाक्य – न चुकता, रोज कसरत करण्याची निखिलने मनाशी खूणगाठ बांधली.
खुशीत मान डोलवणे – आनंदाने होकार देणे.
वाक्य – खेळणे हवे का, असे विचारताच छोटयाश्या विहानने खुशीत मान डोलावली.
खोऱ्याने पैसा ओढणे – खूप पैसा मिळवणे.
वाक्य – दिवसरात्र अभ्यास करून डॉक्टर झालेला प्रणव आज खोऱ्याने पैसा ओढत आहे.
खेटून उभे राहणे – जवळ बिलगून उभे राहणे.
वाक्य – लहानगी सारिका आपल्या आईला अगदी खेटून उभी होती.
खडकातून पाणी काढणे – अशक्य गोष्ट साध्य करणे.
वाक्य – नापीक जमिनीतून चांगले पीक काढून माधवने जणू खडकातून पाणी काढले.
खिळून राहणे – जागच्या जागी स्थिर होणे.
वाक्य – समोर साप पाहताच विनोद खिळून राहिला.
खल करणे – चर्चा करणे.
वाक्य – पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्याबद्दल महानगरपालिकेतील सदस्य गंभीर खल करत आहेत.
खंड न पडणे – एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.
वाक्य – नित्यनियमाने देवपूजा करण्यात आईचा कधीही खंड पडला नाही.
खनपटीला बसने – पिच्छा पुरवणे.
वाक्य – आईने दिलेला अभ्यास पूर्ण करण्याचे दीपाच्या खनपटीला बसवले.
खळखळ करणे – नाखुशीने सतत नकार देणे, टाळाटाळ करणे.
वाक्य – ताटात कारल्याची भाजी वाढली की, रेणू आईपाशी खळखळ करते.
खेद वाटणे – वाईट वाटणे.
वाक्य -आईला वाईट बोलल्याबद्दल, जीवनला खेद वाटला.
खाली मान घालणे – शरम वाटणे.
वाक्य – चूक समजल्यामुळे अनुने खाली मान घातली.
ख्याती मिळवणे – प्रसिद्ध होणे, नाम कमावणे.
वाक्य – मदर तेरेसा यांनी गरिबांची सेवा करून ख्याती मिळवली.
खपणे – कष्ट करणे.
वाक्य – चांगले पीक पिकण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात खपतात.
खुसपट निघणे – काहीतरी दोष निघणे.
वाक्य – विकासने कोणताही व्यवसाय सुरु केला, तरी त्यात काही ना काही खुसपट निघतच होती.
खसखस पिकणे – मोठयाने हसणे.
वाक्य – सरांनी चुटकुला सांगताच सर्व विद्यार्थ्यांमध्ये खसखस पिकली.
Also Read: India Tour of Irland 2022 All Fixture and venue
निष्कर्ष
वरील वाक्प्रचार चा आपल्याला नक्कीच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना उपयोग होईल ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रां सोबत शेअर करायला विसरू नका.