मराठी व्याकरणात शब्दांच्या आठ जाती आहेत त्यापैकी नाम ही एक शब्दाची जात आहे .आजच्या या लेखात आपण नाम म्हणजे काय? व नामाचे प्रकार|Types of noun in marathi हा घटक पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाहणार आहोत.

नाम म्हणजे काय ?
एखाद्या वस्तूच्या ,प्राण्याच्या, पक्ष्यांच्या, ठिकाणच्या,व्यक्तीच्या नावाला नाम असे म्हणतात.थोडक्यात नाम म्हणजे नाव होय.
उदा. गौरव , पुणे ,कबुतर, माकड , टेबल,पुस्तक
वाक्याची सुरुवात नामाने होते.
नामाचे प्रकार

हे हि वाचा :- लिंग व त्याचे प्रकार – मराठी व्याकरण |Gender in Marathi grammar
हे हि वाचा: 100+ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi With Meaning
नामाचे एकूण तीन मुख्य प्रकार आहेत.
१. विशेषनाम
२ . सामान्यनाम – उपप्रकार
१). समुहवाचक नाम
२) पदार्थ वाचक नाम
३.भाववाचक नाम
आता आपण एकेक प्रकार सविस्तर पाहू.
विशेषनाम म्हणजे काय ?
एखाद्या व्यक्तीला ,वस्तूला,प्राण्याला , पक्ष्याला, असलेले विशिष्ट ठराविक नावाला विशेष नाम असे म्हणतात.
उदा. बबिता सुंदर हस्ताक्षर काढते.
या वाक्यात बबिता हे एका मुलीचे विशेष ठराविक नाव आहे .म्हणजेच विशेष नाम आहे.
सामान्य नाम म्हणजे काय ?
जेव्हा एखाद्या नामावरून संपूर्ण जातीचा बोध होतो त्या नामाला सामान्य नाम असे म्हणतात.
उदा. मुले मैदानावर खेळतात.
पक्षी आकाशात उंच उडतात.
वरील दोन्ही वाक्यात अनुक्रमे मुले , पक्षी ही नमे आलेली आहेत .या दोन्ही नामा वरून एका विशिष्ठ जातीचा बोध होतो म्हणून या नामाना सामान्य नाम असे म्हणतात.
सामान्य नामाचे दोन उपप्रकार आहेत.
समुहवाचाक नाम /समुदाय वाचक नाम
जेव्हा नामावरून एखाद्या समूहाचा ,गटाचा बोध होतो तेव्हा त्या नामाला समुहवाचाक नाम /समुदाय वाचक नाम असे म्हणतात.
उदा. टेबलावर पुस्तकांचा गठ्ठा आहे.
डोक्यावर गवताचा भारा घेऊन दमडी निघाली.
इतर समुहवाचक नामे /समुदाय वाचक नामे:- चवड,ताफा, तांडा, गुच्छ,ढीग, मोळी, पेंढी, संघ
पदार्थवाचक नाम
एखाद्या ठराविक परिमाणाद्वारे मोजता येणाऱ्या पदार्थांच्या नावाला पदार्थवाचक नाम असे म्हणतात.
उदा. पेट्रोल ,साखर,दूध,कापड, सोने,चांदी इ.
भाववाचक नाम म्हणजे काय ?
ज्या नामावरून स्वभाव ,भावना,गुणधर्म यांचा बोध होतो त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. – प्रामाणिक ,क्रूर,मायाळू,पारदर्शक ,सदाचारी इ.
नामाचे प्रकार व त्यांची काही उदाहरणे
विशेष नाम | सामान्य नाम | भाववाचक नाम |
अनिता | मुलगी | प्रेमळ |
सुरेश | विद्यार्थी | गुणवंत |
आंबा | देश | मायाळू |
फणस | समुद्र | वक्तशीर |
कबुतर | सैनिक | शिस्तप्रिय |
पोपट | अभिनेता | मानवता |
आग्रा | शिक्षक | कृतघ्न |
नामाचे प्रकार सराव प्रश्नसंच १
निष्कर्ष – नामाचे प्रकार सराव प्रश्नसंच १ सोडवून अधिक सराव करा. हि महिती आवडल्यास नक्की शेअर करा