नमस्कार मित्रांनो vedsrushti.com वर आपले स्वागत आहे. इयत्ता १० वी ,१२ वी बोर्ड परीक्षा,MPSC,पोलिस भरती लेखी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी समास तत्पुरूष समास प्रकार व उदाहरणे Samas Tatpurush Samas Types and Examples याबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा :- How To Study With Concentration In Marathi | एकाग्रतेने अभ्यास कसा करावा ?
समास – व्याख्या (परिभाषा)
प्रत्यय किंवा शब्द वापरून दोन शब्दांमध्ये परस्परसंबंध दाखवला जातो तेव्हा त्या दोन शब्दांचा एकच शब्द तयार होतो अशा प्रकारे केलेल्या या एकीकरणाला ‘समास’ असे म्हणतात.’समास‘ म्हणजे दोन शब्द एकत्रित करून नवीन जोडशब्द तयार करण्याची प्रक्रिया होय.
उदा.राजपुत्र – राजाचा पुत्र (मुलगा) , अनमोल – ज्याचे मोल नाही असा.
समासाचे प्रकार Types Of Samas
समसाचे एकूण चार मुख्य प्रकार आहेत.
- अव्ययीभाव समास
- तत्पुरूष समास
- द्वंद्व समास
- बहुव्रीही समास
समासाच्या वरील प्रकारांपैकी आपण तत्पुरूष समास प्रकार व उदाहरणे Tatpurush Samas Types and Examples या प्रकाराबद्दल माहिती जाणून घेऊया .
समास | तत्पुरूष समास प्रकार व उदाहरणे | Samas | Tatpurush Samas Types and Examples
नक्की वाचा !! लिंग व त्याचे प्रकार – मराठी व्याकरण| Gender In Marathi Grammar
तत्पुरुष समास Tatpurush Samas
या प्रकारच्या समास मध्ये दुसऱ्या पदाला अधिक महत्त्व असते तसेच अशा शब्दांचा विग्रह करताना वगळलेला विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो.
उदा. गुणसंपन्न – गुणाने संपन्न असलेला
तोंडपाठ – तोंडाने पाठ
तत्पुरुष समासाचे प्रकार Types Of Tatpurush Samas
तत्पुरुष समासाचे एकूण सात उपप्रकार आहेत. हे उपप्रकार विभक्ती प्रत्ययाच्या वापरानुसार पडलेले आहेत.हे सर्व प्रकार सविस्तर पाहुयात.
नक्की वाचा !! How To Study With Concentration In Marathi | एकाग्रतेने अभ्यास कसा करावा ?
तत्पुरुष समासाचे प्रकार
- विभक्ती तत्पुरुष समास
- कर्मधारय समास
- द्विगु समास
- मध्यम पद लोपी समास
- नत्र तत्पुरूष समास
- अलुक तत्पुरूष समास
- उपपद (कृदंत ) तत्पुरूष समास
१) विभक्ती तत्पुरुष समास
विभक्ती तत्पुरुष समास या समासात सामासिक शब्दांचा विग्रह करताना वगळले गेलेले विभक्ती प्रत्यय लिहावे लागतात.म्हणून या समासाला ‘विभक्ती तत्पुरुष समास’ असे म्हणतात.
उदा . १) देवपूजा – देवाची पूजा
२) मनुष्यवध – मनुष्याचा वध
३) तोंडपाठ – तोंडाने पाठ
४) वनभोजन – वनातील भोजन
५) गायरान – गायीसाठी रान
३) कर्मधारय समास Karmadharey Samas
ज्या तत्पुरूष समासात दोन्ही पदे प्रथमा विभक्तितीत तसेच पहिले पद हे दुसऱ्या पदाचे वर्णन म्हणून वापरले जाते अशा समासाला ‘कर्मधारय समास’ म्हणतात.
उदा. रक्तचंदन – रक्तासारखे चंदन
महादेव – महान असा देव
लंबोदर – लांब उदर असलेला
गजानन – गजासारखे (हत्तीसारखे ) अनन ( तोंड)
पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
रक्तवर्ण – रक्तसारखा वर्ण ( रंग)
कर्मधारय समासाचे सात प्रकार आहेत
- विशेषण उत्तरपद कर्मधारय समास
- विशेषण उभयपद कर्मधारय समास
- उपमान पूर्वपद कर्मधारय समास
- उपमान उत्तरपद कर्मधारय समास
- अव्यय पूर्वपद कर्मधारय समास
- रूपक कर्मधारय समास
४) द्विगु समास Dvigu Samas
द्वि म्हणजे दोन
या तत्पुरूष समासात पहिले पद हे संख्याविशेषण असते.या समासातून समूह दर्शवतात. याला ‘द्विगु समास ‘ म्हणतात.
उदा. पंधरवडा – पंधरा दिवसांचा समूह
नवरत्न – नऊ रत्नांचा समूह
सप्ताह – सात दिवसांचा समूह
चौरस्ता – चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
चातुर्मास – चार मासांचा समूह
त्रैमासिक – तीन महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे
पंचवटी – पाच वडांचा समूह
५) मध्यम पद लोपी समास Madhyam Pad Lopi Samas
या तत्पुरूष समास प्रकारात पहिल्या पदांचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे वगळावी लागतात त्या समासाला मध्यम पद लोपी समास असे म्हणतात.
उदा.
पुरणपोळी – पुरण घालून केलेली पोळी
बटाटावडा – बटाटा घालून तयार केलेला वडा
६) अलुक तत्पुरूष समास Aluk Tatpurush Samas
अलुक म्हणजे नष्ट न होणारे ,लोप न होणारे या तत्पुरूष समास प्रकारात पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही म्हणून या समासाला ‘अलुक तत्पुरूष समास’ असे म्हणतात.
उदा. अग्रेसर
७) नत्र तत्पुरूष समास
या समास प्रकारात पहिले पद हे नकारार्थी असते. अशा सामासिक शब्दाची सुरुवात अ, अन, बे,गैर, न,ना या सारख्या अक्षरांनी होते.
उदा. बेचव – चव नसलेले.
अनादर – आदर नसलेला
गैरहजर – हजर नसलेला
गैरसमज – चुकीचा समज असलेला
FAQ
तत्पुरूष समासाचे किती प्रकार आहेत ?
तत्पुरूष समासाचे सात प्रकार आहेत
कर्मधारय समासाचे १० उदाहरणे
रक्तवर्ण,रक्तचंदन, पुरुषोत्तम, गजानन, महादेव,महाराष्ट्र, पितांबर, तपोबळ,भवसागर,विषयांतर
द्विगु समासाची १० उदाहरणे
त्रिनेत्र,पंधरवडा,
सप्ताह , नवरात्र, नवरत्न, दशानन , नवरस, त्रैमासिक, साप्ताहिक, सप्तसागर
या लेखात आपण तत्पुरूष समास ,त्याचे प्रकार व उदाहरणे याबद्दल माहिती जाणून घेतली.या माहितीचा नक्कीच आपल्याला परीक्षेत फायदा होईल काही सुधारणा आवश्यक असल्यास आपण सुचवू शकता आपल्या सूचना आम्ही नक्कीच विचारात घेऊ.