How To Study With Concentration In Marathi | एकाग्रतेने अभ्यास कसा करावा ?

नमस्कार मित्रांनो vedsrushti.com वर आपले स्वागत आहे. परीक्षेची तयारीसाठी आपण अभ्यास करतो पण केलेला अभ्यास नीट लक्षात राहत नाही कारण आपण एकाग्रतेने अभ्यास केलेला नसतो.आपले लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात परंतु अशा गोष्टी बाजूला सारून एकाग्रतेने अभ्यास कसा करावा म्हणजेच How to study with concentration In Marathi याविषयी आपण या लेखात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

एकाग्रता म्हणजे काय ?concentration meaning in marathi ?

कोणत्याही कामात एकाग्रता (concentration) महत्वाची असते. किंबहुना त्या कामाची यशस्वीताच एकाग्रतेवर आधारित असते.पौराणिक कथांमध्ये एकलव्य व अर्जुन यांच्या एकग्रतेविषयी आपल्याला माहिती मिळते.सर्व ज्ञानेंद्रियांचा योग्य ,अचूक समन्वय साधून एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजेच एकाग्रता concentration होय.

How To Study With Concentration In Marathi
How To Study With Concentration in Marathi एकाग्रतेने अभ्यास कसा करावा ?

एकाग्रतेचे फायदे |Benefits Of Concentration

एकाग्रतेमुळे कोणकोणते फायदे होतात ते सर्वप्रथम समजून घेऊ.

  • केलेला अभ्यास नीट लक्षात राहतो.
  • अभ्यासाबद्दल आवड निर्माण होते.
  • मानसिक क्षमता विकसित होतात.
  • आत्मविश्वास वाढतो.
  • स्मरणशक्ती वाढते.

एकाग्रतेने अभ्यास कसा करावा ? How To Study With Concentration ?

आपण नेहमी असं म्हणतो की माझं अभ्यासात बिलकुल लक्ष लागत नाही केलेला अभ्यास नीट लक्षात राहत नाही. या विचाराने आपण निराश होतो. अभ्यासापासून आपण दूर जातो पण एकाग्रता कशी वाढवावी व एकाग्रतेने अभ्यास कसा करावा( How To Study With Concentration ?)यासाठी खालील दिलेल्या टिप्स जर आपण उपयोगात आणल्या तर निश्चित आपली एकाग्रता वाढणार आहे .

१) एकाग्रता वाढवण्यासाठी साठी नियमित व्यायाम करा.Do exercise regularly.

असे म्हणतात की Health is wealth.आपलं आरोग्य हिच खरी संपत्ती आहे.शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी व्यायाम आवश्यक आहे.शारीरिक व मानसिक आरोग्य एकाग्रता (concentration)वाढवण्यासाठी चांगले असावे लागते व्यायाम केल्यामुळे ताणतणाव , नैराश्य नष्ट होऊन उत्साह वाढतो जर आपल्या शरीराला व्यायामाची सवय नसेल तर आपल्याला अनेक व्याधी जडतात.आजारी शरीर फार वेळ एकाग्र राहू शकत नाही. म्हणून नियमित व्यायाम ,योगासने करावीत.

२) रात्री पुरेशी झोप घ्या.Take Sufficient Sleep at night.

अभ्यास करण्यासाठी रात्रीचे जागरण टाळावे. पुर्ण झोप घेतल्यामुळे मेंदू फ्रेश राहतो.उत्साह वाढतो.पुरेश्या झोपे अभावी दिवसभर शारीरिक थकवा व आळस येतो त्यामुळे सतत एकाग्रता भंग होते .अभ्यासाचा कंटाळा येतो. म्हणुन पूर्ण झोप घ्या.

३) अभ्यासाचे योग्य नियोजन व प्राधान्यक्रम ठराव .Preplan your studies and decide it’s priority.

परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासाचे योग्य नियोजन व प्राधान्यक्रम ठरवणे महत्त्वाचे असते. उपलब्ध वेळ व अभ्यास याचे नियोजन करताना त्यांचा योग्य प्राधान्य क्रम लावा.अवघड विषयासाठी अधिक वेळ द्यावा.अभ्यासासाठी वेगवेगळे तंत्र ,क्लृप्त्या वापरा .

४) तुमची एक ठराविक दिनचर्या ठरवा . Fix Your Daily Routine

आपली जीवनशैली शिस्तबद्ध असावी.अभ्यासाची वेळ,जेवणाची वेळ,झोपेची वेळ या वेळा ठरलेल्या असाव्यात

५)अभ्यासासाठी योग्य वातावरण व बैठक व्यवस्था .Suitable environment and sitting arrangement for study.

एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी योग्य वातावरण व बैठक व्यवस्था असावी लागते.अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र खोली किंवा जागा असणे आवश्यक असते.अभ्यास करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य जवळ ठेवा जेणेकरून त्यासाठी वारंवार उठावे लागणार नाही. शांततापूर्ण वातावरण एकाग्रता टिकवून ठेवते.

६) स्मार्टफोन, टीव्ही यासारख्या आकर्षणापासून स्वतःला दूर ठेवा.Stay away from smartphone and television

स्मार्टफोन, इंटरनेट ,टीव्ही या साधनांच्या वापरामुळे एकाग्रता भंग होते त्यामुळे मुळे स्मार्टफोनचा कमीत कमी वापर करा मोबाईलचे नोटिफिकेशन ऑफ करा.

७) भरपूर पाणी प्या stay dehydrated always

पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराचे मेटाबोलिजम(metabolism) व्यवस्थित राहते.शारीरिक थकवा जाणवत नाही.अभ्यासात एकाग्रता टिकून राहते.

८)अभ्यासाला आपली आवड बनवा.Be passionate for your studies

Be passionate for your studies

एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला आवडते तेव्हा ती आपल्या कायम लक्षात राहते जसे आपण एखादे गाणे ऐकतो ते गाणे जेव्हा आपल्याला आवडते तेव्हा ते आपल्या लक्षात राहते आपल्या आवडीचा एखादा चित्रपट आपल्या नेहमी लक्षात राहतो कारण तो चित्रपट पाहताना आपण एकाग्र असतो. आपल्या आवडीचे काम करताना आपले मन आपोआप एकाग्र होते . अभ्यासाला ओझे न मानता आपण जर अभ्यासात आवड निर्माण केली तर अभ्यासात आपले मन एकाग्र होते आणि केलेला अभ्यास आपल्याला चांगला लक्षात राहतो.

९)आपल्या मानसिक क्षमता वाढवा.Increase Your Mental Abilities

मानसिक क्षमता विकसित करण्यासाठी शब्दकोडे, सुडोकू,बुद्धिबळ ,जिगसॉ puzzle यांचा सराव करा.याद्वारे स्मरणशक्ती,निरीक्षण,आकलन,तार्किक क्षमता,अनुमान यासारख्या क्षमता विकसित होतात.या क्षमतेमुळे अवघड विषय ,संबोध लवकर समजतात,अभ्यासाची आवड निर्माण होते.एकदा अभ्यासाची आवड निर्माण झाली की एकाग्रता वाढली की त्याचे रूपांतर मग यशात होते.

१०) नेहमी प्रेरित व सकारात्मक रहा Always Stay Motivated And Positive

आपल्या ध्येयाप्रती सदैव प्रेरित आणि सकारात्मक विचार त्यासाठी एखादे चांगले पुस्तक वाचण्याचा छंद झोपासा .यशस्वी लोकांचे मनोगत ऐका त्यांच्या Success स्टोरी ऐका त्यातून प्रेरणा घ्या.

नक्की वाचा :-लिंग व त्याचे प्रकार – मराठी व्याकरण| Gender In Marathi Grammar

नक्की वाचा:-नामाचे प्रकार | Types Of Noun In Marathi

FAQ

एकाग्रतेचा अभाव( lack of concentration) असल्यास काय करावे?

एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान योगा प्राणायाम सराव करा. शब्दकोडे सोडवा बुद्धिबळ खेळा.

एकाग्रता कशी भंग होते ?

मोबाईल , इंटरनेट , टीव्ही यांच्या वापरामुळे एकाग्रता नष्ट होते.

एकाग्रता वाढवण्यासाठी कोणता आहार घ्यावा?

एकाग्रता वाढवण्यासाठी चांगला संतुलित आहार घ्यावा. बदाम सुकामेवा खाल्ल्यामुळे बुद्धी तल्लख होते. आरोग्य चांगले राहते.

निष्कर्ष –

How To Study With Concentration एकाग्रतेने अभ्यास कसा करावा ? ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रां सोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment

You cannot copy content of this page