लिंग व त्याचे प्रकार – मराठी व्याकरण| Gender In Marathi Grammar

लिंग व त्याचे प्रकार (Gender in Marathi grammar) मराठी व्याकरणात लिंग व त्याचे प्रकार (या घटकावर विविध स्पर्धा परीक्षेत प्रश्न येतात.नमस्कार! मित्रानो आज आपण लिंग व त्या चे प्रकारचे या घटकाची माहिती पाहू.

Gender in marathi grammar
लिंग व त्याचे प्रकार – मराठी व्याकरण

लिंग म्हणजे काय ?

नामाच्या ज्या रुपावरून एखादी वस्तू वास्तविक किंवा काल्पनिक पुरुष,स्त्री, किंवा कोणत्याच जातीची नाही असा बोध होतो त्याला लिंग असे म्हणतात

मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार आहेत.

१. पुल्लिंग

२.स्त्रीलिंगी

३. नपुसकलिंग

पुल्लिंग म्हणजे काय ?

ज्या शब्दावरून पुरुष जातीचा बोध होतो त्या शब्दाला पुल्लिंगी शब्द म्हणतात. पुल्लिंगी शब्दासाठी ‘तो ‘ हे सर्वनाम वापरले जाते.पुल्लिंगी शब्द आ कारान्त असतात.

उदा. तो कुत्रा , तो घोडा ,तो राजा, तो पलंग, तो पेढा ,तो पतंग तो वाघ , तो बैल , तो टेबल , तो चेंडू, तो माणूस ,तो घोडा इत्यादी

स्त्रीलिंग म्हणजे काय ?

ज्या शब्दावरून स्त्री जातीचा बोध होतो त्या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द असे म्हणतात.स्त्रीलिंगी शब्दासाठी ‘ती ‘ हे सर्वनाम वापरले जाते उदा. ती नदी ,ती आजी ,ती गाडी ,ती दोरी स्त्रीलिंगी शब्द इ करान्त असतात.

नपुसकलिंग म्हणजे काय ?

ज्या शब्दावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही अशा शब्दास नपुसकलिंगी शब्द म्हणतात.नपुसकलिंगी शब्दासाठी ‘ते ‘ हे सर्वनाम वापरले जातेउदा. ते पक्षी, ते प्राणी,ते कपाट , ते पुस्तक ,ते घर

पुल्लिंगी शब्द कसे ओळखावे ?

ज्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा उच्चार ‘आ’ असा होतो त्या शब्दांना आकारान्त शब्द म्हणतात असे शब्द पुल्लिंगी असतात .उदा . ‘ राजा ‘ या शब्दाचे शेवटचे अक्षर ‘जा ‘ म्हणजेच आकारान्त आहे . म्हणून राजा हा शब्द पुल्लिंगी शब्द आहे.

१)आ कारान्त पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप इ कारान्त तर नपुसकलिंगी रूप ए कारान्त होते.

२)पुल्लिंगी शब्दाचे इण प्रत्यय जोडून स्त्रीलिंगी रूप होणारे शब्द खालीलप्रमाणे आहेत.

३)काही अ कारान्त पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ई कारान्त होते.

100 पुल्लिंगी शब्द व त्याचे स्त्रीलिंगी रूप
पुल्लिंगी रूप स्त्रीलिंगी रूप
राजा राणी
पती पत्नी
आजोबा आजी
भाऊ बहिण
उंट सांडणी
मांजर भाटी
वाघ वाघीण
नर मादी
चिमणा चिमणी
मोर लांडोर
कावळा कावळी
सिंह सिंहीण
माकड माकडीन
कुत्रा कुत्री
मुलगा मुलगी
पोपट मैना
शिक्षक शिक्षिका
गायक गायिका
लेखक लेखिका
कवी कवयत्री
पुत्र कन्या
कुमार कुमारी
माळी माळीण
गवळी गवळण
महाराज महाराणी
पाटील पाटलीण
सावकार सावकारीन
सेवक सेविका
देव देवी
साधू साध्वी
मित्र मैत्रीण
राक्षस राक्षसिण
पुरुष स्त्री
प्रेमी प्रेमिका
कलावंत कलावंतीण
नर्तक नर्तिका
अभिनेता अभिनेत्री
खलनायक खलनायिका
उपासक उपासिका
अध्यापक अध्यापिका
संचालक संचालिका
निर्माता निर्माती
पर्यवेक्षक पर्यवेक्षिका
मुख्याध्यापक मुख्याध्यापिका
नायक नायिका
शिष्य शिष्या
विद्यार्थी विद्यार्थिनी
प्राध्यापक प्राध्यापिका
व्यवस्थापक व्यवस्थापिका
वक्ता वक्ती
बैल गाय
रेडा म्हैस
बोकड शेळी
कोंबडा कोंबडी
हंस हंसी
कार्यकर्ता कार्यकर्ती
बालक बालिका
राजपुत्र राजकन्या
नट नटी
नाग नागीण
कोकीळ कोकिळा
दास दासी
किशोर किशोरी
कोल्हा कोल्हीन
गाढव गाढवीन
कोळी कोळीण
तरुण तरुणी
घोडा घोडी
धोबी धोबीन
वर वधु
गृहस्थ गृहिणी
पुतण्या पुतणी
भगवान भगवती
श्रीमान श्रीमती
हत्ती हत्तीण
हरीण हरणी
युवक युवती
सासरा सासु
महोदय महोदया
सुतार सुतारीण
मामा मामी
बाबा आई
विधुर विधवा
स्वामी स्वामिनी
आचार्य आचार्या
सम्राट सम्राज्ञी
दाता दाती
नवरा बायको
बेडूक बेडकी
परिचर परिचारिका
राजकर्ता राज्यकर्ती
दिग्दर्शक दिग्दर्शिका
दिर जाऊ
गाडा गाडी
मालक मालकीण
तेली तेलीण
सदस्य सदस्या
कारभारी कारभारीण
जनक जननी
चुलता चुलती
नक्की वाचा : 100+ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi With Meaning
लिंग या घटकावर साधारणपणे खालील प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात.

१) दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा.

२) दिलेल्या पुल्लिंगी शब्दासाठी स्त्रीलिंगी रूप कोणते ते ओळखा

३)दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

Leave a Comment

You cannot copy content of this page