जांभूळ खाण्याचे फायदे | Benefits of jamun in Marathi | 10 Best health benefits of blackberry

दरवर्षी पावसाळ्यात बाजारात येणारे जांभूळ हे फळ आपल्या आरोग्यासाठी खुपचं फायदेशीर आहे .आंबट गोड चव असणारे हे फळ आपल्या विविध औषधी गुणधर्मामुळे खूप महत्वपूर्ण आहे.विविध आरोग्याच्या समस्यांवर जांभूळ हे फळ हे अतिशय गुणकारी आहे . या फळाची साल ,बी यांचा औषध म्हणून वापर करतात या लेखात आपण जांभूळ खाण्याचे दहा फायदे जाणून घेणार आहोत.

जांभूळ खाण्याचे फायदे | Benefits of jamun in Marathi |  10 Best health benefits of blackberry

जांभळातील औषधी घटक
व्हिटॅमिन A , व्हिटॅमिन C . आयर्न , पोटॅशियम

१ ) जांभूळ हे फळ मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी एक वरदान आहे .जांभूळ या फळातील एका विशेष औषधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.
२ ) या फळात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणत असल्याने डोळ्याचे आरोग्य यामुळे चांगले राहते.दात व हिरड्या स्वस्थ राहतात.
३) अपचन, जुलाब , भूक न लागणे इतर पोट विकारावर जांभळाच्या बियांचे पावडर सेवन केल्याने लाभ होतो.
४) जांभूळ रक्तदाब नियंत्रणात ठेवते. त्यामुळे मधुमेह हृदयविकार पासून बचाव होतो.
५ )जांभूळ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते त्यामुळे अनेमिया रक्ताची कमतरता इ. आजार दूर होतात.
६) त्वचेवर सतत होणाऱ्या पिंपल्स , सुरकुत्यावर जांभळाच्या बियाची पावडर गाईच्या दुधात टाकून हा लेप चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.त्वचा नितळ होते.
७) यातील antioxidant रोगप्रतिकारकशक्ती (immunity ) वाढवते.शरीर निरोगी व सुदृढ होते.

८) मुतखडा साठी उपचार म्हणून जांभळाच्या बियांचे पावडर दह्याबरोबर घेतल्यास त्रास कमी होतो.
९) जांभूळ रक्तवर्धक आहे तसेच ते नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करते.
१०)जांभळाचे syrup पाण्याबरोबर नियमित घेतल्यामुळे भूक वाढते.

हे ही वाचा – मराठी वाक्प्रचार

Leave a Comment