100 अलंकारिक शब्द अर्थासह |Alankarik Shabd In Marathi Grammar

नमस्कार मित्रांनो vedsrushti.com वर आपले स्वागत आहे.अलंकार या शब्दाचा शब्दश: अर्थ दागिना असा होतो. आपण चांगले दिसावे म्हणून आपण दागिना घालतो. दागिना घातल्याने जसे आपले बाह्यरूप, प्रभावी, आकर्षक ,खुलून दिसते तसेच मराठी भाषेत असे काही अलंकार आहेत की ज्यामुळे मराठी भाषेचे भाषिक सौंदर्य अधिक प्रभावी ,आकर्षक खुलून दिसते.या शब्दांना ‘अलंकारिक शब्द’ असे म्हणतात. या शब्दाच्या वापरामुळे कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त अर्थ समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येतो. अलंकारिक शब्द वापरून केलेले भाषण किंवा लेखनाला अधिक वजन प्राप्त होते.लेखात आपण या लेखात आपण 100 अलंकारिक शब्द त्यांच्या अर्थासह पाहणार आहोत तसेच या ठिकाणी हे शब्द तुम्हाला pdf स्वरूपात डाउनलोड करायला मिळतील.

अलंकारिक शब्द
अलंकारिक शब्द

अलंकारिक शब्द म्हणजे काय ? Meaning of Alankarik Shabd

भाषेचे सौंदर्य अधिक उठावदार ,प्रभावीपणे खुलून दिसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना ‘अलंकारिक शब्द’असे म्हणतात. अलंकारिक शब्दांचा शब्दश: अर्थ लक्षात न घेता याठिकाणी त्याचा लक्षार्थ लक्षात घ्यावा लागतो.

50 अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

अलंकारिक शब्द अर्थ
अक्षरशत्रू निरक्षर
अजातशत्रू एक ही शत्रू नसलेला
अकरावा रुद्र अतिशय रागीट माणूस
अकलेचा कांदा मूर्ख
अष्टपैलू सर्वगुणसंपन्न
औरस मूळचा
आळवावरचे पाणी अशाश्वत, फार काळ न टिकणारे
अंडीपिल्ली गुप्त गोष्ट
अकबरी प्रथा चांगली प्रथा
ओनामा एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे
कळीचा नारद भांडण लावणारा
कोल्हेकुई निरार्थक बडबड
कर्णाचा अवतार अतिशय दानी व्यक्ती
कच्चे मडके मंद बुद्धीचा माणूस
कुंभकर्ण अतिशय झोपाळू व्यक्ती
कैकयी भांडखोर स्त्री
कुपमंडूक संकुचित वृत्तीचा
काडी पहिलवान हडकुळा व्यक्ती
कळसुत्री बाहुले दुसऱ्याचे म्हणण्याप्रमाणे वागणारा
खडाजंगी मोठे भांडण
खेटराने पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे
खुशाल चेंडू चैनीखोर माणूस
गाजरपारखी कसलीही पारख नसलेला
गरुड झेप खूप मोठी महत्वकांक्षा, प्रगती
गर्भ श्रीमंत जन्मापासूनच श्रीमंत
गंडांतर मोठे संकट, संकटाची परिस्थिती
गोगलगाय निरुपद्रवी प्राणी
गजांतलक्ष्मी फार मोठे वैभव असलेला
गुरुकिल्ली रहस्य, मर्म
घर कोंबडा घराच्या बाहेर न पडणारा
घाण्याचा बैल सतत एकच काम करणारा
घोडचूक खूप मोठी चूक
घोरपड कामाची चिकाटी असलेला
चांडाळचौकडी कटकारस्थानी लोकांचा समूह
चर्पटपंजरी निरर्थक बडबड
चौदावे रत्न खूप मार
छत्तीसचा आकडा वैर ,शत्रुत्व
जगन्नाथाचा रथ सर्वांच्या सहकार्याने केली जाणारे काम
जमदग्नीचा अवतार अतिशय रागीट , तापट स्वभाव
टांगती तलवार सतत भीतीची जाणीव असणे
तळहातावरचा फोड अतिशय प्रिय व्यक्ती
ठणठणपाळ दरिद्री व अडाणी व्यक्ती
ताटाखालचे मांजर दुसऱ्याच्या तंत्राने वागणे
तारेवरची कसरत अतिशय सावधपणे करावयाचे काम
त्रिशंकू एक ना धड
पांढरा परीस लबाड व धूर्त
पोपटपंची अर्थ न कळता पाठांतर करणे
पाताळयंत्री कारस्थान करणारे
मोगलाई अंदाधुंदी
मुक्ताफळे वेडे वाकडे बोल

नक्की वाचा 👉 Collective Nouns In Marathi| समुहदर्शक शब्द

नक्की वाचा 👉 100+ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi With Meaning

50 अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

अलंकारिक शब्द अलंकारिक शब्दांचा अर्थ
दामाजीपंत पैसा
देव माणूस चांगला सज्जन माणूस
दगडावरची रेघ कधीही न बदलणारे
नवकोट नारायण खूप श्रीमंत व्यक्ती
पर्वणी अतिशय दुर्मिळ योग
उंटावरचा शहाणा चुकीचे निरर्थक सल्ला देणारा
उंबराचे फुल दुर्मिळ वस्तू
पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू
गौडबंगाल जादू
अस्थिपिंजर अत्यंत काटकुळी व्यक्ती
अवदसा भांडखोर स्त्री
अरण्यपंडित मूर्ख व्यक्ती
बगलबच्चा हस्तक
नंदीबैल सांगेल तसे वागणारा
आंबटद्राक्षे न मिळणाऱ्या गोष्टीला नावे ठेवणे
गोगलगाय गरीब माणूस
ध चा मा कपटपूर्वक केलेला बदल
त्राटिका भांडखोर स्त्री
दर्या मे खसखस अतिशय अल्प प्रमाणात
नाना फडणवीस विलक्षण बुद्धीचा धोरणी माणूस
धारवाडी काटा अचूक वजनाचा काटा
पिकले पान म्हातारा माणूस
पंढरीची वारी निष्फळ हेलपाटे
बिन भाड्याची खोली तुरुंग
भोळा सांब भोळा माणूस
भरत भेट दीर्घकाळानंतर दोन प्रिय व्यक्तींची भेट
पडता काळ कठीण परिस्थितीचा काळ
भीष्मप्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा किंवा निश्चय
बोके संन्यासी ढोंगी मनुष्य
भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न
लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री
मायेचा पुत पराक्रमी माणूस
मारुतीचे शेपूट लांब जाणारे काम
वाटाण्याच्या अक्षदा नकार
रुद्रावतार अतिशय तापट माणूस
मृगजळ आभास
मंथरा दुष्ट स्त्री
लंबकर्ण बेअकली
लक्ष्मण रेषा मर्यादा
लवंगी मिरची न घाबरता बोलणारी स्त्री
शंभर नंबरी पूर्णपणे खरे
वामन मूर्ती ठेंगू मनुष्य
वकीलपत्र दुसऱ्याची बाजू घेऊन बोलणे
वाहती गंगा आलेली संधी
फकीरी बाणा साधी सरळ राहणी
शकुनी मामा कपटी मनुष्य
सांबाचा अवतार भोळा माणूस
हुकमी एक्का खात्रीलायक साधन
कपिलाषष्ठीचा योग अतिशय दुर्मिळ योग पुष्कळ काळानंतर आलेली संधी
काळाबाजार खोटा व्यवहार
अधिक सरावासाठी खालील प्रश्नसंच सोडवा
प्रश्नसराव संच क्र. १
प्रश्नसराव संच क्र. २

पाप्याचे पितर या अलंकारिक शब्दाचा अर्थ

पाप्याचे पितर या अलंकारिक शब्दाचा अर्थ-अतिशय हडकुळी व्यक्ती

बोलघेवडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ

बोल घेवडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ- खूप बडबड करणारा व्यक्ती

श्री गणेशा या अलंकारिक शब्दाचा अर्थ

श्री गणेशा या अलंकारिक शब्दाचा अर्थ-एखाद्या का चांगल्या कामाची सुरुवात .

कुंभकर्ण या अलंकारिक शब्दाचा अर्थ

कुंभकर्ण या अलंकारिक शब्दाचा अर्थ झोपाळू व्यक्ती असा होतो

अलंकारिक शब्द दळूबाई

दळूबाई अलंकारिक शब्दाचा अर्थ रड्या ,रडका, भित्रा, कर्तुत्वशून्य असा होतो.

निष्कर्ष :-

आम्ही आशा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल. या माहितीचा उपयोग नक्कीच आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेत होईल. यात काही सुधारणा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा.

Leave a Comment

You cannot copy content of this page