एक मिनिटात ऑनलाईन 7 / 12 कसा शोधायचा ?| Online 7/12

7/12 हा शेत जमिनी चा महत्त्वाचा दस्तावेज आहे . विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आवश्यक असतो.हा सातबारा ऑनलाइन कसा शोधायचा ? हे आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. ऑनलाईन सातबारा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल विभागाने
https://bhulekh.mahabhumi.gov.in


ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. या वेबसाईटवर आपल्याला सातबारा, नमुना ८अ, मालमत्ता पत्रक इत्यादी दस्तऐवज पाहता येणार आहेत.

ऑनलाईन 7 / 12 कसा शोधायचा ?


आता आपण ऑनलाईन सातबारा या साइटवरून कसा शोधायचा हे सविस्तर समजून घेऊ.


Step 1

ऑनलाईन 7 / 12 कसा शोधायचा ?| Online 7/12
ऑनलाईन 7 / 12 कसा शोधायचा ?| Online 7/12

राज्यात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत. तुमचा जिल्हा ज्या प्रशासकीय विभागात येतो तो प्रशासकीय विभाग सर्वप्रथम निवडा.


Step 2

ऑनलाईन 7 / 12 कसा शोधायचा ?| Online 7/12
ऑनलाईन 7 / 12 कसा शोधायचा ?| Online 7/12


यानंतर आपला जिल्हा निवडा किंवा महाराष्ट्र राज्याच्या नकाशात आपला जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा


Step 3

ऑनलाईन 7 / 12 कसा शोधायचा ?| Online 7/12
ऑनलाईन 7 / 12 कसा शोधायचा ?| Online 7/12


यानंतर आपला तालुका व गाव निवडा.


Step 4


यानंतर जर तुम्हाला तुमच्या शेतीच्या गट नंबर/सर्वे नंबर माहीत असल्यास सर्वे नंबर वर क्लिक करून तुमच्या शेतीचा सर्वे नंबर टाकून सर्च करा


Step 5


जर तुम्हाला सर्वे नंबर माहित नसल्यास संपूर्ण नाव यावर क्लिक करून अापण आपल्या शेतीचा सातबारा शोधू शकता.


Step 6


यानंतर सातबारा डाऊनलोड करण्यासाठी आपण आपला मोबाईल नंबर नमूद करा.
यानंतर 7/12 पहा यावर क्लिक करा captcha
अचूक टाका. यानंतर आपल्या शेत जमिनीचा सातबारा आपल्याला पाहता येईल.

हे पण वाचा: समुहदर्शक शब्द |Samuhadarshak Shabd in Marathi

Leave a Comment