50 Collective Nouns In Marathi| समुहदर्शक शब्द

Collective nouns in marathi

नमस्कार !! मित्रांनो vedsrushti.com वर आपले स्वागत आहे.Mpsc पुर्व आणि मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर मध्ये मराठी विषयाच्या व्याकरणावर काही प्रश्न विचारले जातात मराठी व्याकरणातील एक भाग म्हणजे समूहदर्शक शब्द तर आजच्या या लेखात आपण समूहदर्शक शब्द म्हणजे काय? 50 समूहदर्शक शब्द (50 Collective Nouns In Marathi समुहदर्शक शब्द समूहदर्शक शब्दावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नसंच इत्यादी माहिती पाहणार आहोत.स्पर्धा ,नोकर भरती परीक्षांमध्ये हमखास collective nouns in Marathi समूहदर्शक शब्द वर आधारित प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न अचूक सोडवण्यासाठी खाली दिलेल्या समूहदर्शक शब्दांचा नक्कीच आपल्याला उपयोग होईल.समूह म्हणजे एकाच जातीच्या वस्तूंचा गट किंवा सजातीय वस्तूंचा गट त्याला आपण समूह असे म्हणतो . उदाहरणार्थ फुलांचा समूह ,पुस्तकांचा समूह, खेळाडूंचा समूह .
सर्वप्रथम आपण पाहणार आहोत.

Collective Nouns In Marathi
Collective Nouns in Marathi

समुहदर्शक शब्द म्हणजे काय ?

एकापेक्षा अधिक वस्तुंच्या ,व्यक्तीच्या , पदार्थाच्या ,प्राण्याच्या ,पक्ष्यांच्या समुहाला उद्देशुन वापरल्या जाणाऱ्या शब्दास समुहदर्शक शब्द (Collective Nouns) असे म्हणतात.

उदाहरणार्थ- फुलांच्या समूहाला गुच्छ असे म्हणतात

पुस्तकांच्या समूहाला गठ्ठा असे म्हणतात .

50 Collective Nouns In Marathi समुहदर्शक शब्द

50 Collective Nouns In Marathi समुहदर्शक शब्द
अनु. क्र.समुहसमुहदर्शक शब्द
1पुस्तकांचा गठ्ठा
2वह्यांचा गठ्ठा
3प्रश्नपत्रिकांचा संच
4करवंदाची जाळी
5आंब्याचीराई
6द्राक्षांचा घोस ,घड
7विमानांचा ताफा
8उंटांचा तांडा
9खेळाडूंचासंघ
10गवताचाभारा
11दुर्वांचीजुडी
12लाकडाची मोळी
13सैनिकांचीतुकडी,पलटण
14चोरांचीटोळी
15किल्ल्यांचाझुबका
16फुलांचागुच्छ
17गुरांचाकळप
18पक्ष्यांचा थवा
19वाहनांचा ताफा
20माणसांचाघोळका
21गवताचीपेंढी
22वर्तमानपत्रगठ्ठा
23नाण्यांचीचळत
24धान्याची रास
25पोत्यांची थप्पी
26भांड्यांचीउतरंड
27बाबुंचे बेट
28वेलीचा ताटवा ,कुंज
29केसांचापुंजका
30केसांचीबट
31नारळाचाढीग
32नोटांचीपुडकी,थप्पी
33वाद्यांचा वृंद
34हत्तींचाकळप
35फळांचा घोस
36उसाचीमोळी
37मुंग्यांचीरांग
38जहांजाचा काफिला
39प्रवाशांचीझुंबड
40दरोडेखोरांचीटोळी
41मडक्यांचीउतरंड
42विद्यार्थ्यांचागट
43दगडांचाढीग
44पर्यटकांचाचमू
45डोंगरांचीरांग
46नद्यांचासंगम
47पोळ्यांचीचवड
48 पालेभाजीचीगड्डी
49हरणांचा कळप
50फुलझाडांचाताटवा
समुहदर्शक शब्द

अधिक सरावासाठी खालील प्रश्नसंच सोडावा.

 

1.पाहुण्यांचा फुलांचा _____ देवून सन्मान करण्यात आला.





ANSWER= (B) गुच्छ
Explain:- पाहुण्यांचा फुलांचा _गुच्छ__ देवून सन्मान करण्यात आला

 

2. जशी करवंदाची – जाळी तशी गवताची -______ ?





ANSWER= (D) पेंढी
Explain:- जशी करवंदाची – जाळी तशी गवताची -__पेंढी____

 

3. जसा विमानांचा – ताफा तसा जहांजाचा – _____





ANSWER= (B) काफिला
Explain:- जसा विमानांचा – ताफा तसा जहांजाचा – काफिला

 

4. साखरेच्या डब्ब्याजवळ मुंग्यांची _____ लागली होती





ANSWER= (C) रांग
Explain:-साखरेच्या डब्ब्याजवळ मुंग्यांची __रांग__ लागली होती .

 

5. समुहदर्शक नसलेला शब्द ओळखा





ANSWER= (A) पोथी
Explain:- समुहदर्शक नसलेला शब्द पोथी आहे

समूहदर्शक शब्द बहुपर्यायी प्रश्न संच

प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

1.दिलेल्या पर्यायातून समूहदर्शक शब्द निवडा.

  • गोदाम
  • दुर्ग
  • जत्रा
  • जुडगा

2. जर पुस्तकांचा – गठ्ठा तर दगडांचा – ………..

  • घड
  • घोस
  • ताटवा
  • ढीग

3. सैनिकांची…………. युद्ध मोहिमेसाठी सज्ज झाली.

  • रांग
  • तुकडी
  • ओळ
  • टोळी

4.जंगलातील प्राणी…………. करून राहतात.

  • टोळी
  • संघ
  • कळप
  • तुकडी

5.जहाजांचा -……………….

  • ताफा
  • तांडा
  • काफिला
  • चमू

6.चुकीची जोडी शोधा .

  • करवंदाची – जाळी
  • चोरांची – तुकडी
  • लाकडाची – मोळी
  • गवताचा – भारा

7. चुकीची जोडी शोधा.

  • बांबूचे – कुंज
  • पुस्तकांचा – गठ्ठा
  • दुर्वांची – जुडी
  • ऊसाची – मोळी

8. योग्य जोडी शोधा.

  • विमानांचा – काफिला
  • जहाजाचा – तांडा
  • उंटांचा – ताफा
  • केसांचा – पुंजका

9. आकाशातून पक्ष्यांचा ……….. आपापल्या घरट्यांकडे जात आहे.

  • थवा
  • ताटवा
  • घोळका
  • समुह

10. पिशवीतील नोटांची ——— पाहून मी किसनराव थक्क झाले.

  • रास
  • पुडकी
  • चळत
  • चवड

11. जसे उंटांचा – तांडा तसे द्राक्षांचा —

  • ढीग
  • घड
  • गठ्ठा
  • गट

12. खालीलपैकी समूह दर्शक नसलेला शब्द कोणता?

  • जुडी
  • मोड
  • पेंढी
  • टोळी

13. भारा कशाचा असतो ?

  • भाजीचा
  • फळांचा
  • गवताचा
  • लाकडांचा

14. गुच्छ कशाचा असतो ?

  • फुलांचा
  • पानांचा
  • फळांचा
  • कळ्यांचा

15. जर धान्यांची – रास तर धान्यांच्या पोत्यांची ——

  • थप्पी
  • चवड
  • चळत
  • पुंजका

उत्तरसुची:-1)जुडगा 2) ढीग 3)तुकडी 4) कळप

5)काफिला 6)चोरांची – तुकडी 7) बांबूचे – कुंज 8)केसांचा – पुंजका 9)थवा 10) पुडकी 11) घड 12)मोड 13) गवताचा14) फुलांचा 15) थप्पी

Read more :- नामाचे प्रकार | Types Of Noun In Marathi

Read more :- 100+ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi With Meaning

Collective Nouns In English

निष्कर्ष

वरील लेखात आम्ही समूहदर्शक शब्द म्हणजे काय ? 50 शब्द समूहदर्शक शब्द दिलेले आहेत आम्ही अशी आशा करतो की या माहितीचा आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये उपयोग होईल ही माहिती आपल्याला आवडल्यास नक्की शेअर करा.

FAQ

फुलांचा समुह दर्शक शब्द

फुलांचा समुह दर्शक शब्द – गुच्छ आहे

समुहदर्शक शब्द भाजीची ?

समुहदर्शक शब्द भाजीची – गड्डी

समुहदर्शक शब्द म्हणजे काय ?

जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तू असतात तेव्हा अनेक फुले , भरपुर दगड,अनेक पुस्तके असे शब्द न वापरता फुलांचा गुच्छ, दगडांचा ढीग,पुस्तकांचा गठ्ठा असे शब्द वापरतो . गुच्छ, ढीग, गठ्ठा अशा शब्दाना समुह दर्शक म्हणतात

समुह दर्शक शब्द प्राण्यांचा ?

समुह दर्शक शब्द प्राण्यांचा – कळप

1 thought on “50 Collective Nouns In Marathi| समुहदर्शक शब्द”

Leave a Comment

You cannot copy content of this page