शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे .आपल्या देशातील जवळपास 75 टक्के पेक्षा जास्त लोक उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत.पण बदलते हवामान व अनियमितता यामुळे शेती हा व्यवसाय संकटात आला आहे . वाढणारा शेतीचा खर्च व शेतमालाला मिळणारा भाव यातील तफावत यामुळे मध्यम व लहान शेतकरी यांना मदत मिळावी या उद्देशाने केंद्र व राज्य सरकरमार्फत शेतकऱ्याच्या हितासाठी विविध लाभाच्या योजना राबवण्यात येतात.
आज आपण अशाच प्रकारची एका योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.या योजनेचा लाभ कसा घ्यावा ? याचा लाभ कोणाला मिळू शकतो ?
अर्ज कुठे करावा ? अशी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
किसान क्रेडिट कार्ड योजना

शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध शेतीची अवजारे , यंत्रे यांची गरज असते .त्यासाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे .
या योजेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी कमीत कमी व्याजदराने कर्ज दिले जाते. अल्पभूधारक छोट्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत केसीसी कर्ज केवळ ७ टक्के व्याज दराने दिले जाते .जर शेतकऱ्याने हे कर्ज एका वर्षाच्या आत चुकते केले तर ३ टक्के सुट दिली जाते.
किसान क्रेडिट कार्ड योजना या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे शेतकऱ्याने त्यांच्या बँकेत जमा करणे आवश्यक आहे जसे की आधारकार्ड ,पॅनकार्ड, सातबारा उतारा,पासपोर्ट साईज् फोटो, शपथपत्र इ.